Friday 7 October 2016

वकील डॉक्टर झाली मिनिस्टर माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत

वकील डॉक्टर झाली मिनिस्टर ,वकील डॉक्टर झाली मिनिस्टर ,
फिराया लागलीस गाडीत,फिराया लागलीस गाडीत,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत.....२

अधिकारांना फिरती आज,पुरुषावर चढे आवाज,
सरकारी कामाला जाई,अंगा वरती सोन्याचा साज,
टीप टॉप राहते कामाला जाते,टीप टॉप राहते कामाला जाते,
रोज च नवीन साडीत,रोज च नवीन साडीत,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत।।१।।

लई होता तो बिकट काळ, होती जोईशी धुराचं  जाळ ,
चूल फुकता फुकता जाई दर दिवसाची तुझी सकाळ,
गेला तो काळ गेली ती वेळ,गेला तो काळ गेली ती वेळ,
विसरली बसून मांडीत,विसरली बसून मांडीत,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत।।२।।

क्रांती कराया निघाली पुढे,अंगी साऊन शेणाचे शितुडे,
तुम्ही शिकावे नवीन धडे,सदा याच साठी तडफडे,
घरो घर फिरून हाताला धरून,घरो घर फिरून हाताला धरून,
घातलं तुला बालवाडीत,घातलं तुला बालवाडीत,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत।।३।।

धान्य झाली आई  सावित्री,मुक्त करून श्री च्या जाती,
राजकारणात तुला मान मिळतोय ग किती,
सुनील चमक घेऊन जीत,सुनील चमक घेऊन जीत,
झाली तुझी आघाडी त,झाली तुझी आघाडी त,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत।।४।।

वकील डॉक्टर झाली मिनिस्टर ,वकील डॉक्टर झाली मिनिस्टर ,
फिराया लागलीस गाडीत,फिराया लागलीस गाडीत,
माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचे शेण कूड झाडीत......


No comments:

Post a Comment