Sunday 9 April 2017

वाघ भीम माझा (बाबासाहेबांवर पोवाडा)

वाघ भीम माझा (बाबासाहेबांवर पोवाडा)

साऱ्या जगी ज्याचा गाजावाजा
झाला नाही दुजा
ऐसा कुणी राजा
साऱ्या जनियेचा राजा
गरिब जनतेचा खरा राजा
होता असा वाघ भीम माझा रं जी जी जी जी रं जी

त्यानं जातं पातं खोडली
गुलामी तोडली
माणसं जोडली
मुडद्यालाही आली खरी जाग
पेटवली रक्तामध्ये आग
केलं त्यानं भित्र्यालाही वाघ रं जी जी जी जी रं जी

होता राजा आमचा गुणवंत
आणि शिलवंत
जैसा कुणी संत
न्याय त्यानी सदा खरा केला
तरीही नायं कधी भ्याला
खोट्याचा नायनाट केला रं जी जी जी जी रं जी