Tuesday 4 October 2016

होता भीमराव लई दिलदार, तुला फुकट दिलया सार

जमीन जुमला भला तो बंगला, तुला केलया  वारसदार,
होता भीमराव लई  दिलदार, तुला फुकट दिलया सार ||

गावकुसाच्या बाहेर होतं तुझं मोडक तोडकं घरं,
ज्याला सोईचं  नव्हतं दार, वर कचाट्याचं छप्पर 2,
गळ्यात मडकं पाठीला झाडु, फिरायचा  दरोदार,
होता भीमराव लई  दिलदार, तुला फुकट दिलया सार ||

नव्हतं जवळ  बसत  कोणी,  नव्हतं मल्याच  दीसत  कोणी,
होता असून नसल्यावानी,  नव्हतं तुला रं  पुसत  कोणी, 2
भले भले ते झुकतात आजं , केलं तुला मतदार,
होता भीमराव लई  दिलदार तुला फुकट दिलया सार ||

आता हातात आला फोन आणि दारात  आली गाड़ी,
गाववेशीच्या  बाहेर हाय का , आता गावत बनली माड़ी,2
गळ्यात सोनं  हातात सोनं, (तुझ्या) बोटात अंगठ्या चार,
होता भीमराव लई  दिलदार तुला फुकट दिलया सार 
 ||

खातों भिमाची  तूप अन  रोटी , नावं भलत्याचं घेतोय ओठी,
धन बापाचं बसलाय  दाबून, काय  केलं तू समाजसाठी,2
बंगला हा सारा सुनिल समाज,  आता बसना गड़ी गप् गारं,
होता भीमराव लई  दिलदार तुला फुकट दिलया सार 
 ||

जमीन जुमला भला तो बंगला, तुला केलया  वारसदार,
होता भीमराव लई  दिलदार, तुला फुकट दिलया सार ||

No comments:

Post a Comment