Thursday 25 August 2016

तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ

पडलो होतो आम्ही सारे काळ अंधारात,पडलो होतो आम्ही सारे काळ अंधारात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

मुक्यास मिळाली वाचा, बहिर्यास कान  ,तोट्यास मिळाले हाथ भीमाचे हे दान ,
मुक्यास मिळाली वाचा, बहिर्यास कान,तोट्यास मिळाले हाथ भीमाचे हे दान
लुळी पांगळी हि जंगली इथे संसारात,लुळी पांगळी हि जंगली इथे संसारात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

माश्यांचे मोहळ उठले गरिबांना चावत सुटले,पाप्यांचे पेवात तूटले माय बहिणीला लुटले,
माश्यांचे मोहळ उठले गरिबांना चावत सुटले,पाप्यांचे पेवात तूटले माय बहिणीला लुटले,
काळाच्या काळोखाला चिरले दिनरात, काळाच्या काळोखाला चिरले दिनरात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

झाली विद्याच्या किरणांनी पावन धरणी,अशी केली अघटित करणी नमला जुलूम चरणी,
झाली विद्याच्या किरणांनी पावन धरणी,अशी केली अघटित करणी नमला जुलूम चरणी,
भीम जन्म सार्थक  झाला भवसागरात,भीम जन्म सार्थक झाला भवसागरात,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

या दिशा उजळल्या धायी(१०) जण देती ग्वाही, भीम रवी आला पहा तम आम्हा नाही,
या दिशा उजळल्या धायी(१०) जण देती ग्वाही,भीम रवी आला पहा तम आम्हा नाही,
झाली मंडी जाती आजला रूढी संग्रहात ,झाली मंडी जाती आजला रूढी संग्रहात ,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,
तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ,तो प्रकाश होऊन आला रमाई चा नाथ।।

No comments:

Post a Comment